स्वेरीला संशोधनासाठी आजवर साडेसहा कोटी रूपयांचा निधी

दिल्ली येथील केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीच्या फंड फॉर इंप्रुव्हमेंट ऑफ  सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी (फिस्ट )इन्फ्रास्ट्रक्चर योजने अंतर्गत स्वेरीला 60 लाख रुपयांचा संशोधन निधी मिळाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली. दरम्यान या संस्थेस आजवर साडेसहा कोटी रूपये संशोधनासाठी मिळाले आहेत.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर अंतर्गत असलेली रिसर्च अ‍ॅण्ड  डेव्हलपमेंट अर्थात संशोधन विभागा अंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी असलेल्या प्रयोगशाळेच्या  अत्याधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडे  14 जून 2018 रोजी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाला तेथील समितीने अभ्यास करून हिरवा कंदील दाखविला असून साठ लाख रुपये निधी मंजुरीचे पत्र फिस्ट ग्रुपचे प्रमुख व शास्त्रज्ञ डॉ. ए. मुखोपाद्याय यांच्या स्वाक्षरीसह मिळाले आहे. डी.एस.टीया नामवंत संस्थेच्या फिस्ट प्रोग्रॅम या योजने अंतर्गत मिळालेला निधी हा पाच वर्ष कालावधीसाठी असणार आहे. 30 आक्टोंबर 2018 मध्ये झालेल्या कोचीनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत या संशोधनाचे सादरीकरण स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे आणि शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी केले होते. हा संशोधन निधी मिळाल्यामुळे भविष्यात अत्याधुनिक मशिन्स निर्माण होवून विकासाला गती मिळणे शक्य होणार आहे. अत्याधुनिकीकरण नंतर याचा उपयोग सिव्हील इंजिनिअरींग विभागात लोड फ्रेम इक्यूपमेंट, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अ‍ॅडव्हान्सड मॅन्युफॅक्चरिंग सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग आणि कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरींग विभागात एन.आय. सॉफ्टवेअर अ‍ॅण्ड हार्डवेअर सिस्टम म्हणून उपयोग केला जाणार आहे. फिस्ट योजने अंतर्गत निधी मिळविणारे महाराष्ट्रातील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून हे दुसरे महाविद्यालय आहे तर मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत येणार्‍या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून हे पहिलेच आहे. स्वेरीमध्ये संशोधन विभागाची स्वतंत्र निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत जवळपास 5. 75 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून आता यामध्ये या 60 लाख रुपये निधीची भर पडली असल्यामुळे एकूण निधी जवळपास 6. 45 कोटी रुपये इतका झाला आहे. साठ लाखांचा निधी मिळाल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल शिंदे यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!