घे भरारीला प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद
पंढरीत आयोजित घे भरारी -3 या गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन टिळक स्मारक मंदिर येथे 12 व 13 जानेवारी रोजी संपन्न झाले. याचे उद्घाटन सुधाकरपंत परिचारक व भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे हस्ते करण्यात आले होते. या प्रसंगी शहरातील प्रथम पिढीतील यशस्वी उद्योजकांना परिचारक यांचे हस्ते गौरविण्यात आले.
या प्रदर्शनात एकूण 20 स्टॉल लावण्यात आले होते व त्यातील बहुसंख्य महिला उद्योजिकांचे होते. अगदी वय वर्ष 75 पासून ते अगदी तरुण महिला उद्योजिकानी यात सहभागी होऊन आम्ही ही कुठे कमी नाही याची प्रचिती दिली. खरेदीदारांचा उत्साह वाढविण्यासाठी दररोज लकी ड्रॉ काढण्यात येत होते. यासाठी सदस्य प्रसाद कुलकर्णी (वरद अल्युमिनियम) व महेश आराध्ये (अश्विनी ट्रेडिंग) यांनी मोलाचे सहकार्य केले. तर शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात आला या साठी कौस्तुभ देशपांडे (विश्व दर्शन हॉली डे )यांनी सहकार्य केले.सर्व पंढरपूरकरांनी याला हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . दोन दिवसात एक लाख रूपयांची उलाढाल झाली.