श्री विठ्ठल अभियांत्रिकीचे प्रा.संदीप वांगीकर यांना पी.एच.डी. प्राप्त

पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मकॅनिकल  इंजिनिअरिंग  विभागातील प्रा. संदीप सीताराम वांगीकर यांना नुकतीच  सिलचर (आसाम) मधील एन.आय.टी. तथा राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानमधून अभियांत्रिकीच्या डिझाईन अँन्ड डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोचॅनेल फॉर इफेक्टीव्ह मिक्सिंग ऑफ मल्टीफ्लूइडस.् या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला प्रबंध प्रौद्योगिकी संस्थेमध्ये सादर केला होता. या प्रबंधावरून त्यांना पी.एचडी. प्रदान करण्यात आली.
            सिलचर मधील एन.आय.टी.च्या  मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील डॉ. पी.के.पटवारी व डॉ. आर. डी. मिश्रा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने प्रा.वांगीकर यांनी पी.एचडी. पूर्ण केली. त्यांना आई, वडील , भावंडे, पत्नी सौ. विद्या यांच्यासह इतर प्राद्यापकांचेही बहुमोल सहकार्य लाभल्याचे डॉ. वांगीकर यांनी सांगितले. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल स्वेरीच्या वतीने डॉ. वांगीकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. वांगीकर हे स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या नऊ वर्षापासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. त्याचबरोबर एन.आय.टी. कालिकत (केरळ), स्वेरीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेऊन संशोधन पेपर सादर केले होते, चार आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये आणि दोन बुक चॅप्टरमध्ये शोध प्रबंध प्रकाशित झाली आहेत तसेच एका जर्नल पेपरसाठी इन्स्टिटयुट फॉर एकस्प्लोरिंग अ‍ॅडव्हान्सेस इन इंजिनिअरींग (आय.इ.ए.इ) यांच्यातर्फे रिसर्च एक्सलन्स अवार्ड घोषित झाले आहे. यावेळी संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, विश्‍वस्त  सूरज रोंगे  यांच्यासह इतर स्वेरीचे पदाधिकारी व विश्‍वस्त, संस्थेंअंतर्गत असणार्‍या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. वांगीकर यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!