मकरसक्रांतीः विठ्ठल रूक्मिणीचा गाभारा सजला

मकरसक्रांतीनिमित्त पंढरीत श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचा गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला असून मंगळवारी सकाळपासून महिला भाविकांनी रूक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. शेतात पिकलेले धान्य व तिळगूळ आज श्री विठ्ठलला अपर्ण करण्याची परंपरा आहे. यासाठी राज्यभरातून येथे भक्त आले होते. संक्रांत हा महिलांचा सण मानला जातो. या दिवशी वाण देण्याची परंपरा असते. यासाठी रूक्मिणी मंदिरात महिला भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिरात आज केवळ महिला कमर्र्चारीच नियुक्त करण्यात आल्या होत्या. संक्रांती निमित्त आज देव व देवीचा गाभार आकर्षक फुलांनी पहाटेच सजविण्यात आला होता. यामुळे येथील वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते. येथे सौभाग्याचे प्रतीक मानल्या जाणार्‍या लाखेपासून तयार केलेल्या चुड्यांना आज मोठी मागणी होती. मंदिराबाहेर याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. अत्यंत आकर्षक अशा या बांगड्या केवळ पंढरीतच तयार होतात. याच बरोबर शहरात सर्वत्र संक्रांतीनिमित्त तिळगूळ वड्या, साखर हलवा , रेवड्या विक्रीची दुकाने सजली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!