प्रतिभा युवा महोत्सवाची बुधवार व रविवारी प्राथमिक फेरी

पंढरपूर- युवकामध्ये दडलेल्या या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व कलासंपन्न व्यक्तींच्या कला समाजासमोर प्रदर्शित करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे दि. पंढरपूर अर्बन को-ऑप.बँकेच्या वतीने य राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे सातवे वर्ष असून याची प्राथमिक फेरी उद्या बुधवार 16 जानेवारी पासून सुरू होत असल्याची असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील जे कलावंत प्राथमिक फेरीपासून वंचित राहीले आहे, अशा सर्व कलावंतासाठी बुधवार दि.16 व रविवार 20 जानेवारी 2019 रोजी ही प्राथमिक फेरी असणार आहे. या युवा प्रतिभा महोत्सवाच्या पुणे, लातूर, सांगली, सोलापूर येथे प्राथमिक फेर्‍या संपन्न झाल्या असून यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. सदर युवा प्रतिभा महोत्सवामध्ये सुगमगीत, युगूलगीत, वैयक्तिकनृत्य, समूहनृत्य, चित्रप्रतिभा या स्पर्धेचा समावेश आहे. सदर युवा प्रतिभा महोत्सवाची अंतिम फेरी 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी  रोजी टिळक स्मारक मंदिर, पंढरपूर येथे सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. या युवा महोत्सवामध्ये सुगमगीत, वैयक्तिकनृत्य, चित्रप्रतिभा या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक-5000/-, द्बितीय क्रमांक-3000/-, तृतीय क्रमांक-2000/- व उत्तेजनार्थ 1000/- रूपयाची दोन पारितोषिके, समूहनृत्य स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक-15000/-, द्बितीय क्रमांक-11000/-, तृतीय क्रमांक-9000/- व उत्तेजनार्थ 5000/- रूपयाची दोन पारितोषिके युगुलगीत स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक-7000/-, द्बितीय क्रमांक- 5000/-, तृतीय क्रमांक-3000/- व उत्तेजनार्थ 1000/- रूपयाची दोन पारितोषिके, रोख पारितोषिके तसेच आकर्षक सन्मानचिन्ह अशा भरघोस बक्षिसाचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा 16 ते 30 वयोगटातील युवक-युवतींसाठी खुली आहे. सदर युवा प्रतिभा महोत्सवाची पंढरपूर पंढरपूर पंढरपूरयेथील प्राथमिक फेरी तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवून आपली प्रतिभा सादर करावी, असे आवाहन बँकेचे व्हा.चेअरमन दीपक शेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश रा.विरधे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9637861001, 9623722828, 9049003579, 9822220098, 9890578787, 9850831745 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!