पंढरपूर व मंगळवेढ्यातील रस्त्यांसाठी पावणे दहा कोटी रू.
पंढरपूर- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील पाच रस्त्यांसाठी 9 कोटी 65 लाख 52 हजार रूपयांचा निधीस मंजूर मिळाली आहे, अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
पंढरपूरसह मंगळवेढा तालुक्यातील अनेक रस्त्यांसाठी निधीची मागणी सातत्याने शासनाकडे होत होती. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तसेच संशोधन व विकासकामातंर्गत निधी मिळावा, यासाठी परिचारक प्रयत्नशील होते. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा होत होता. त्याचेच यश म्हणून मंगळवेढा तालुक्यातील तीन तर पंढरपूर तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी असा एकूण 9 कोटी 65 लाख 52 हजारांचा निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये आता मंगळवेढा मित्रनगर, गरडवस्ती रस्ता (जुना मारापूर रस्ता) (एल.आर.- 158/व्ही.आर.-265/) लांबी 5.80 किमी कामाची रक्कम रू.384.56 लक्ष, नंदेश्वर ते बंडगरवस्ती, दोलतडे वस्ती रस्ता (एल.आर.-84/व्ही.आर.-123, लांबी 2.20 किमी) रक्कम रू.168.58 लक्ष, तळसंगी ते शिंदे वस्ती रस्ता (एल.आर.-32/एन.पी.-4, लांबी 1.86 किमी) रक्कम रू.131.97 लक्ष इतका निधी मंजूर झाला आहे. तर पंढरपूर तालुक्यातील शिरगांव ते वाडेकर वस्ती जुना ढवळस रस्ता (एल.आर.-41/ व्ही.आर.206 लांबी 2.00 किमी) रक्कम रू.146.44 लक्ष आणि कासेगांव ते तपकिरी शेटफळ रस्ता (एम.आर.एल.-4/ व्ही.आर.-94 लांबी 1.800 किमी) रक्कम रू.133.97 लक्ष रूपये निधी मंजूर झाला आहे. तसेच पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जवळ-जवळ 30 ते 35 किमी रस्त्याची मागणी केली असून त्याही रस्त्यांच्या कामांना मंजूर मिळेल अशी अपेक्षा आहे, असे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. याअगोदर ही पंढरपूर तालुक्यातील (सन 2015-16 सालात सुपली, पळशी ते झांबरेवस्ती रस्ता 6.00 किमी रक्कम रू.268.59, सन 2016-17 सालात करकंब ते नरसाळेवस्ती रस्ता 2.385 किमी रक्कम रू.150.52, तावशी ते शिंगनवस्ती रस्ता 1.80 किमी रक्कम रू.107.58, सुस्ते ते पखालपूर रस्ता 3.00 किमी रक्कम रू.193.69, तुंगत ते पवार वस्ती रस्ता 3.00 किमी रक्कम रू.179.14, खेडभासे ते पवारवस्ती रस्ता 1.50 किमी रक्कम रू.84.04, बोहाळी ते लमाणवस्ती रस्ता 3.00 किमी रक्कम रू.177.86, सन 2017-18 सालात शेगांव दु. ते आरकिलेवस्ती रस्ता 2.00 किमी रक्कम रू.115.49, सरकोली ते फुलेनगर रस्ता 4.00 किमी रक्कम रू.218.66, पट.कुरोली ते नरसिंगवाडी रस्ता 5.50 किमी रक्कम रू.290.52, रांझणी ते हंकारेवस्ती रस्ता 6.00 किमी रक्कम रू.291.80, गुरसाळे ते अंबिकानगर ते चिंचोली भोसे रस्ता 2.40 किमी रक्कम रू.105.60, तसेच सन 2018-19 सालात रा.मा.141 ते गोसावीवस्ती रस्ता 0.900 किमी रक्कम रू.44.38, कान्हापुरी ते देशमुखवस्ती रस्ता 1.40 किमी रक्कम रू.63.78, खर्डी ते घाडगेवस्ती रस्ता 3.00 किमी रक्कम रू.137.48, रांझणी ते तरटगांव रस्ता 6.00 किमी रक्कम रू.284.99, तिसंगी ते कारंडेवस्ती रस्ता 5.10 किमी रक्कम रू.273.52) व मंगळवेढा तालुक्यामधील (मंगळवेढा ते माचणुर 8.00 किमी रस्त्यास रक्कम रू.630.97, मंगळवेढा-टिआर-1 ते सिध्दापूर 12.00 किमी रस्त्यास रक्कम रू.941.34, हुलजंती ते सलगर खु. 9.22 किमी रस्त्यास रक्कम रू.626.72, महमदाबाद ते लक्ष्मीदहिवडी 5.00 किमी रस्त्यास रक्कम रू.285.09, शिरसी ते लेंडवे चिंचाळी 5.20 किमी रस्त्यास रक्कम रू.317.56, हुलजंती ते भुयार 8.80 किमी रस्त्यास रक्कम रू.617.76)