पालकमंत्री देशमुख यांच्याकडून तुळशीवनाची पहाणी

वन विभागामार्फत यमाई तलाव येथे तुळशीवन विकसित करण्यात आले असुन.  जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज तुळशीवनास भेट देवून, पाहणी केली.

पंढरीत येणाऱ्या भाविकांबरोबर पर्यटकांसाठी तुळशीवन आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, तुळशीवनामध्ये विठ्ठलाची  भव्य मुर्ती, विविध संताच्या 8 शिल्पे उभारण्यात आले आहेत,  आकर्षक कारंजे व विद्युत रोषणाई ,विविध प्रकारच्या तुळशी, 23 संताचा जीवनपट दाखविणारी भिंत्ती चित्रे  तुळशीवृंदावनात उभारण्यात आली आहेत. तसेच सर्व तुळशीवृंदावन परिसर सी.सी.टी.व्हीच्या कक्षेत आणला आहे.  पालकमंत्री देशमुख यांनी  तुळशी वृंदावनाची पाहणी करुन अन्य विकासकामाची माहिती घेतली.  यावेळी बांधकाम विभाकाचे कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण, वनविभागाचे अधिकारी  व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!