माता रूक्मिणीकडून वनवासी आश्रमातील महिलांना साड्या भेट

माता रूक्मिणीच्या चरणावर हजारो भक्त साड्या अपर्ण करत असतात. ही वस्त्र श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने वनवासी आश्रम कल्याण आश्रमातील माता भगिनींसाठी दिली जात असून जवळपास एक हजार साड्या शनिवारी या यासाठी पाठविण्यात आल्या आहेत. माता रूक्मिणीकडून वनवासी महिलांना ही भेट प्रतिवर्षी दिली जाते. या साड्या वनवासी आश्रमासाठी शिरीष पारसवार यांच्याकडे समितीकडून सोपविण्यात आल्या. यावेळी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर,सदस्या शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होेते. मंदिर समितीच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हजारो साड्या देवीच्या पायावर भाविक अपर्ण करतात. त्यातील एक हजार साड्या वनवासी माता भगिनींना पोहोच केल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!