सोलापूर सुप्रसिद्ध कापड दुकानावर ‘आयकर’ विभागाची धाड

सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर शहरातील प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याच्या घरावर आणि व्ही.आर.पवार दुकानावर ‘आयकर’ विभागाने धाड टाकून तपासणी केली. ही कारवाई गुरूवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

‘आयकर’ पुणे विभागाच्या स्कॉडने अचानक व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकली. घरातील सर्व ठिकाणाची तपासणी करण्यात आली. शिवाय कागदोपत्री रेकॉर्ड पाहण्यात आले. त्यानंतर व्यापाऱ्याला घेऊन बाजार पेठेतील त्याच्या दुकानात नेण्यात आले. तेथे पहाणी करण्यात आली. दुकान दिवसभर बंद ठेवून रेकॉर्ड तपासण्यात आले. दिवसभराच्या या कारवाई दरम्यान नेमक काय झालं? याची माहिती मात्र समजू शकली नाही. पुणे स्कॉडच्या कारवाईमुळे शहर व जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!