स्वेरीत येत्या रविवारी स्व. मधुकरराव मोरे स्मृती चषक बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन
पंढरपूर- सध्या स्पर्धेचे युग असून प्रत्येक विद्यार्थी नव्या युगाच्या नव्या प्रवाहात यशस्वीपणे तग धरला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होण्याबरोबरच त्यांना चालना मिळावे याहेतूने खेळाचा उद्देश आणि स्वेरीच्या पुढाकाराने सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोशिएशन, श्री रामजगदीश महिला बहुउद्देशीय उत्कर्ष संस्था व चेस असोशिएशन, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये स्व मधुकरराव मोरे स्मृती चषक बुद्धीबळ स्पर्धेचे येत्या रविवारी, दि २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजन केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद नागपूरचे सदस्य डॉ. विश्वासराव मोरे व स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी दिली.
पंढरपुरात प्रथमच आयोजिलेल्या जिल्हास्तरीय भव्य बुद्धिबळ स्पर्धेत ५ वर्षापासून ते २१ वर्षापर्यंतच्या वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी प्रवेश फी म्हणून पन्नास रुपये असून स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी सकाळी १० ते १०.३० या वेळेत पंढरपूर एस.टी. स्टँड पासून बसची सोय करण्यात आली आहे. ५ वर्षे, ६ वर्षे,७ वर्षे,८ वर्षे, १० वर्षे, १२ वर्षे, १५ वर्षे व २१ वर्षे वयोगटातील विजेत्यांना रोख रक्कम देण्यात येणार असून पहिल्या क्रमांकासाठी उत्तेजनार्थ म्हणून स्मृती चषक देण्यात येणार आहे. बुद्धीबळ स्पर्धेसाठी स्पर्धकांनी पट, सोंगट्या, चेस ब्लॉक स्वतः आणाव्यात. यास्पर्धेचे बक्षीस वितरण मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे व पंढरपुरच्या नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले यांच्या शुभ हस्ते २७ जानेवारी रोजीच स्पर्धा संपल्यानंतर सायंकाळी होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे हे भूषविणार आहेत. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रवींद्र मोरे, सौ. अनुराधा कोडग, सौ. अश्विनी नागणे, वृणाल मोरे, सौ. प्राजक्ता मोरे आदी परिश्रम घेत आहेत. यावेळी चेस असोशिएशनचे अध्यक्ष दिगंबर सुडके, उपाध्यक्ष मोहन यादव, मिलिंद बडवे आदी उपस्थित राहणार आहेत. तरी अधिकाधिक बुद्धीबळ स्पर्धकांनी सहभागी व्हावे. तसेच या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोशिएशनचे सचिव शरद नाईक (९४२३३३७३४६),अमर मोरे (८९९९९५९७५४), नानासाहेब देवकते (९२८४९६३००२) यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.