स्वेरी पॉलिटेक्निकच्या 25 विद्यार्थ्यांना 100 गुण
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांनी घेतलेल्या हिवाळी 2018 परीक्षेत पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) कॉलेजच्या एकूण 115 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त तर 80 टक्के ते 89.99 टक्के पर्यंत 405 विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश मिळवले. 25 जणांना विविध विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण प्राप्त झाले आहेत.
प्रथम वर्षातील गणित (एम.वन) या विषयात तब्बल 15 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 पैकी गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.तर याच विषयात 97 व त्यापेक्षा जास्त गुण 37 विद्यार्थ्यांनी मिळवले. द्वितीय वर्षातील स्ट्रेंग्थ ऑफ मटेरीअल (सॉम ) या विषयामध्ये समीर शरद कदम यांनी 100 गुण मिळवून तर द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेतील यश विवेक कटकमवार,प्रणोती सुखदेव कोष्टी,प्रीती पंडित रणपिसे या 3 विद्यार्थ्यांनी ओओपी या विषयामध्ये 100 गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. याच शाखेतील विद्यार्थी ऋतुजा युवराज गायकवाड, स्नेहा किरण हिंगमिरे, यश विवेक कटकमवार, प्रणोती सुखदेव कोष्टी, महानंदा पुजारी, प्रीती पंडित रणपिसे अशा 6 विद्यार्थ्यांनी डाटा स्ट्रक्चर युजींग-सी या विषयांमध्ये 100 गुण मिळाले आहेत, अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी दिली. या वर्षी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका या वर्गाचा ऑल क्लियर निकाल 83.94 टक्के एवढा लागला.यामध्ये प्रथम तीन क्रमांक -गीतांजली महादेव चव्हाण-97.57 टक्के, संगीता नारायण पुजारी-91.53 , आदेश बळीराम नाईकवाडी-91.41 टक्के. द्वितीय वर्ष संपूर्ण शाखेतून तीन क्रमांक पुढील प्रमाणे -यश विवेक कटकमवार व प्रणोती सुखदेव कोष्टी यांना प्रत्येकी 96.80, महानंदा पुजारी -96.13 टक्के, ऋतुजा युवराज गायकवाड-95.73 टक्के य. तर तृतीय वर्षामधील प्रथम तीन क्रमांक- धनेश जाधव-94.59 टक्के, अथर्व चंद्रकांत भोसले-93.78 , सिद्धेश जगदीश खडके-92.63..यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर.बी. रिसवडकरइतर पदाधिकारी, विश्वस्त यांनी अभिनंदन केले आहे.