निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई, नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये ५ कोटी हस्तगत, बड्या नेत्यावर संशय
.निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई
.नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये ५ कोटी हस्तगत
.प्रकरणात बड्या नेत्यावर संशय
नाशिक प्रतिनिधी : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. आज राज्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधीचं घबाड सापडलं आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. यात पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे.
नाशिकमधल्या या नामांकित हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या नावे २ खोल्या बूक आहेत. एका काळ्या रंगाच्या कारमध्ये या रोकडच्या बॅगा सापडल्या आहेत. पाच कोटींपैकी २ कोटी जप्त केले असून, उर्वरित पैशांचा शोध सुरू आहे सध्या सुरु आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे.