बुधवारी सिध्दापूरच्या मातुर्लिंग गणपतीची यात्रा

महाराष्ट्रासह आंध्र ,कर्नाटक राज्यातील  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धापूर येथील मातुलिर्ंग गणपतीची यात्रा बुधवार 16 रोजी संपन्न होत आहे. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भिमगोंडा नांगरे- पाटील व कल्लाप्पा मलगोडे- पाटील यांनी दिली.
भीमा नदीच्या पात्रात प्रकट झालेली गणपतीची स्वयंभू मूर्ती असून नवसाला पावणारा बाळ गणेश   म्हणून प्रसिद्ध तो प्रसिध्द आहे. भीमा नदीपात्रात मध्यावर पाण्यात तो प्रकटला असून  दरवर्षी संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी किंक्रातीस  मोठी यात्रा भरते लाखो भाविक यासाठी येत असतात.
यात्रा ठिकाणी भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी व्यवस्था, आरोग्य सुविधा,  वीज, सुरक्षा ,भाविकांना धुळीचा त्रास होऊ नये
यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत.
16 जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता श्री ची महापूजा पालकमंत्री विजयकुमार देशमुख,माजी आमदार सुधाकर परिचारक याच्या हस्ते होणार आहे.  यावेळी आमदार भारत भालके, समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे ,विजयसिंह राजे पटवर्धन,खासदार शरद बनसोडे ,रविकांत तुपकर ,बबनरावजी अवताडे ,समाधान आवताडे, शैला गोडसे,पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले , मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र भारूड साहेब , प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!