वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले

वर्धा : विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील एवोनिथ स्टील कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून भूगाव इथल्या कंपनीत फर्निशच्या बाजूला हा स्फोट होऊन मोठी आग (Fire) लागली आहे. कंपनीत कुलिंग प्रोसेसचे काम सुरू असताना स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या स्फोटात 17 कामगार जखमी असून यातील काही कामगार गंभीर असल्याची माहिती आहे. स्फोटाच्या (Blast) घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने जखमी व गंभीर जखमींना शहरातील सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेतील गंभीर जखमींना नागपूरला हलविण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान, स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.

कंपनीत लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कंपनील काही द्रव्यांचा स्फोट झाल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचं पाहायला मिळालं. स्थानिकांनी व अग्निशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्र रुप धारण केल्याचं दिसून आलं. या दुर्घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, आगीचे लोट दूरपर्यंत पसरल्याने कंपनीतील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!