चिंचवडमध्ये नाकाबंदी दरम्यान ३५ लाखांची रोकड पकडली

चिंचवड (रात्र गुन्ह्याची) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान ३५ लाख ११ हजार २०० रुपयांची रोकड पकडली आहे. चिंचवडगाव येथे चापेकर चौकाजवळ गुरुवारी (दि. ७) सकाळी अकराच्या सुमारास चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगाव परिसरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी केली आहे. नाकाबंदीत संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास महिंद्रा बोलेरो (क्रमांक एमएच- ०१, सीव्ही- ६५४५) या वाहनाची तपासणी केली. त्यावेळी या वाहनात लोखंडी पेटीत ३५ लाख ११ हजार २०० रुपयांची रोकड आढळून आली. ही रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी निवडणूक अधिकारी आणि प्राप्तिकर विभागाला कळविण्यात आले आहे.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त मुकुटलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दीपक गोसावी, उपनिरीक्षक अजित दुधे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!